या व्याघ्र प्रकल्पाची तब्बल १२ कोटींची फसवणूक
चंद्रपूर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला वर्षभर देश-विदेशातून हजारों पर्यटक भेच देत असतात. मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी येथे जाण्यासाठी बुकींग करावे लागते. यासाठी नेमलेल्या चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन या सफारी बुकिंग एजन्सीने अभयारण्य प्रशासनाची तब्बल तब्बल १२ कोटी १५ लाख रुपयांची फडवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिकीट बुक करणाऱ्या एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन ही सफारी बूकिंग एजन्सी पर्यटकांचे बुकींग करत होती. मात्र, या एजन्सीने पैसे थकविल्याने जिप्सी चालकांच्या जून आणि जुलै महिन्याचे पगार उशिरा झाले होते. यावेळी हा प्रकार उघडकीस आला. तब्बल १२ कोटी १५ लाख रुपयांची ही मोठी फसवणूक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रकल्पाला एजन्सीने तीन वर्षांत एकूण २२ कोटी ८० लाख ६७ हजार देय रकमेपैकी फक्त १० कोटी ६५ लाख रुपयांचा भरणा केला. मात्र, उर्वरित १२ कोटी १५ लाख रुपये देण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी हे पैसे दिले नाहीत. ही बाब प्रकल्पाला समजल्यावर एजन्सीचे संचालक अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
SL/KA/SL
19 Aug 2023