या जिल्ह्यांमध्ये तब्बल २४२ कोटी रु विजबील थकबाकी

 या जिल्ह्यांमध्ये तब्बल २४२ कोटी रु विजबील थकबाकी

मुंबई,दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढलेल्या वीज बिल दरामुळे सध्या सर्वसामान्य नागरिकांसह लहान मोठे उद्योजक देखील त्रस्त झाले आहेत. यातील काही जणांचा कल विज बिल न भरण्याकडे दिसून येतोय. विजबिल थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरणला विशेष मोहिम राबवली जात आहे. राज्यातील चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तब्बल २४२ कोटी रु विजबील थकले आहे. महावितरणकडून ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात येत आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत.

 विज बिल थकबाकीचे स्वरूप

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी २४२ कोटी ९० लाखांच्या घरात पोहोचली आहे.

  • घरगुती ग्राहकांकडून १३ कोटी ६८ लाख थकबाकी
  • वाणिज्यिक ग्राहकांकडून ४ कोटी १२ लाख थकबाकी
  • औद्योगिक ग्राहकांकडून ६ कोटी ६३ लाख थकबाकी
  • ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून ३ कोटी ४३ लाख थकबाकी
  • ग्रामीण व शहरी पथदिवे यांच्याकडून २०८ कोटी ३१ लाख थकबाकी

दरम्यान महावितरणची आर्थिक स्थिती समजून घेऊन ग्राहकांनी थकबाकी भरून महावितरण या आपल्याच कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे. SL/KA/SL

8 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *