एप्रिलमध्ये किरकोळ महागाईत किंचित घट

 एप्रिलमध्ये किरकोळ महागाईत किंचित घट

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एप्रिलमध्ये (April) किरकोळ महागाई (Retail inflation) दर म्हणजेच ग्राहक किंमत निर्देशांकामध्ये (सीपीआय) (CPI) काही प्रमाणात घट नोंदवण्यात आली आहे. केंद्र सरकारने किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (Ministry of Statistics and Program Implementation) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये अन्नधान्याच्या किंमती (food prices) कमी झाल्याने किरकोळ महागाई दर (सीपीआय) 4.29 टक्के होता. मार्च मध्ये तो 5.52 होता. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चलनविषयक धोरण ठरविताना ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित किरकोळ महागाईला महत्त्व देते यावरुन महागाई दराशी संबंधित आकडेवारी किती महत्त्वाची आहे याचा अंदाज बांधता येतो.
 

मार्चमध्ये उत्पादन वाढले
Production increased in March

मागील आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात म्हणजेच मार्च 2021 मध्ये औद्योगिक उत्पादनात 22.4 टक्के वाढ दिसून आली. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) (NSO) ने जाहीर केलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या (आयआयपी) (IIP) आकडेवारीनुसार मार्च 2021 मध्ये उत्पादन क्षेत्राचे उत्पादन 25.8 टक्क्यांनी वाढले. गेल्या वर्षी मार्च 2020 मध्ये कोरोना साथीमुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीचा परिणाम औद्योगिक उत्पादनावर दिसून आला होता आणि आयआयपीमध्ये 18.7 टक्क्यांची घट झाली होती.

वीज निर्मितीत 22.5 टक्के वाढ
22.5 per cent increase in power generation

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च 2021 मध्ये खाण उत्पादनात 6.1 टक्के आणि वीज निर्मितीत 22.5 टक्के वाढ झाली. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये आयआयपी 8.6 टक्क्यांनी घसरला, तर 2019-20 मध्ये 0.8 टक्क्यांची घसरण होती. गेल्या आर्थिक वर्षात कोरोना साथीमुळे औद्योगिक उत्पादनात घट झाली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आयआयपीमध्ये 5.2 टक्क्यांची वाढ झाली होती.

एप्रिल मध्ये सीपीआय महागाई तीन महिन्यांच्या नीचांकावर
CPI inflation hits three-month low in April

मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात अन्नधान्य चलनवाढीचा दर 2.02 टक्के होता जो मार्च 2021 मध्ये 4.87 टक्के होता. पत मानांकन संस्था इक्राच्या (ICRA) मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांच्या म्हणण्यानुसार एप्रिल 2020 मध्ये किरकोळ महागाईचा दर अत्यंत उच्च पातळीवर होता, कारण त्यावेळी देशभरात टाळेबंदीमुळे पुरवठ्यात अनेक अडथळे होते. त्या तुलनेत एप्रिल 2021 मध्ये सीपीआय महागाई तीन महिन्यांच्या नीचांकावर पोहोचली. मात्र अंदाजापेक्षा ती जास्तच होती. नायर यांच्या मते, एप्रिल 2021 मध्ये किंमतींवर स्थानिक पातळीवर लागू असलेल्या निर्बंधाचा फारसा परिणाम दिसून येत नाही.
 
Retail inflation, as measured by the Consumer Price Index (CPI), declined slightly in April. The central government has released retail inflation figures. According to data released by the Ministry of Statistics and Program Implementation, retail inflation (CPI) stood at 4.29 per cent in April on account of lower food prices.
 
PL/KA/PL/13 MAY 2021

mmc

Related post