पाकचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून या बलुची नेत्याची नियुक्ती

 पाकचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून या बलुची नेत्याची नियुक्ती

इस्लामाबाद, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनेक दिवसांपासून राजकीय अस्थिरतेचा सामना करणाऱ्या पाकीस्तानला आता एका बलुची नेत्याच्या रुपात काळजीवाहू पंतप्रधान लाभणार आहेत. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून अनवर ऊल हक्क काकर यांची निवड करण्यात आली आहे. पाकिस्तानचे शहबाज शरीफ सरकार विसर्जित झाल्यानंतर शनिवारी कार्यवाहक सरकारची स्थापना करण्यात आली होती. राष्ट्रपतींनी त्यांना शनिवार पर्यंत काळजीवाहू पंतप्रधान निवडण्यास सांगितले होते. चर्चेच्या अनेक फेऱ्या झडल्यानंतर अनवर रुल हक्क काकर यांची निवड करण्यात आली. आजच ते पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी राजीनामा दिलेले शहबाज शरीफ आणि नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते राजा रियाज यांना शनिवारपर्यंत राष्ट्रपतींकडे काळजीवाहू पंतप्रधानाचे नाव द्यायचे होते. त्यानंतर अनवर यांच्या नावावर दोन्ही नेत्यांनी एकमत व्यक्त केलं. अनवर बलुचिस्तान प्रांतातून असून ते शनिवारीच पदाची शपथ घेतील असं सांगण्यात येतंय. पाकिस्तानची संसद ९ ऑगस्ट रोजी विसर्जित करण्यात आली होती.

इम्रान खान सरकार पडल्यानंतर पाकिस्तानमध्ये राजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे. पाकिस्तान पूर्वीपासूनच आर्थिक आणि सुरक्षेसंबंधी समस्या झेलत आहे. राजकीय अस्थिरतेमुळे पाकिस्तानचे पाय आणखी खोलात जाणार आहेत. निवडणूक निष्पक्षपाती वातावरणात होण्यासाठी काळजीवाहू सरकारची स्थापना करणे आवश्यक होते.

मागील आठवड्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणी अटक करण्यात आली आहे. लाहोर पोलिसांनी खान यांना त्यांच्या जमान पार्क येथील घरातून अटक केली. इस्लामाबादच्या ट्रायल कोर्टाने त्यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच पुढील 5 वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही.

SL/KA/SL

12 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *