आंगणवाडी सेविकांना मानधन वाढीसोबत नवीन भरतीही

 आंगणवाडी सेविकांना मानधन वाढीसोबत नवीन भरतीही

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील आंगणवाडी सेविकांच्या मानधनात आजवरची सर्वात मोठी वीस टक्के इतकी वाढ केली जाईल तसेच २०,१८३ इतकी रिक्तपदे या मे महिन्यांपर्यंत भरली जातील अशी माहिती महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली.

याबाबतचा प्रश्न कुणाल पाटील यांनी उपस्थित केला होता, ही वाढ अत्यंत अपुरी आहे त्यामुळे त्यांना किमान वेतन मिळावे अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली , विरोधक यावर आक्रमक झाले , मंत्री समाधानकारक उत्तर देत नाही असा आरोप करीत त्यांनी सभात्याग केला.

१५० कोटी खर्चून सेविकांना नवे मोबाईल दिले जातील , त्यात केवळ नाव सोडून बाकी माहिती मराठीत भरण्याची व्यवस्था केली जाईल असं मंत्री म्हणाले. ग्रामीण भागात आंगणवाडी जागेसाठी एक हजार ऐवजी दोन हजार भाडे दिले जाईल. वीज बिल भरण्याच्या साठी पन्नास कोटी ची तरतूद करण्यात आली आहे, शहरी भागात कंटेनर मध्ये आंगणवाडी सुरू केली जाईल , मुंबईत त्याची सुरुवात केली जाईल आणि अशा २०० आंगण वाड्या सुरू केल्या जातील अशी माहिती मंत्री लोढा यांनी दिली.Anganwadi sevaks along with salary increase also new recruitment

ML/KA/PGB
3 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *