अमूल अमेरिकेत लाँच करणार फ्रेश मिल्क प्रॉडक्ट

 अमूल अमेरिकेत लाँच करणार फ्रेश मिल्क प्रॉडक्ट

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय झालेला स्वदेशी मिल्क ब्रॅण्ड अमूल आता थेट अमेरिकेत भरारी घेणार आहे.टेस्ट ऑफ इंडिया’ या टॅगलाइनसह अमूल दुग्धजन्य पदार्थ यूएसमध्ये लाँच करण्याची योजना आखत आहे.यासाठी अमूलचे संचालन करणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) ने अमेरिकेतील सहकारी मिशिगन मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन (MMPA) सोबत भागीदारी केली आहे.नोव्ही, मिशिगन येथे एमएमपीएच्या 108 व्या वार्षिक बैठकीत या भागीदारीची घोषणा करण्यात आली. जयेन मेहता, व्यवस्थापकीय संचालक, GCMMF, म्हणाले, ‘मला तुम्हाला कळवण्यास आनंद होत आहे की अमूल अमेरिकेत त्यांचे फ्रेश मिल्क प्रॉडक्ट लाँच करणार आहे.आम्ही युनायटेड स्टेट्समधील 108 वर्ष जुन्या डेअरी सहकारी संस्थेशी भागीदारी केली आहे. ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा अमूल आपली नवीन उत्पादन श्रेणी भारताबाहेर लाँच करेल.

यापूर्वी 22 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर GCMMF च्या सुवर्ण महोत्सवी समारंभात पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील शेतकऱ्यांना अमूलला जगातील सर्वात मोठी डेअरी बनवण्याची विनंती केली होती.मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमूल दूध अमेरिकेत एक गॅलन (3.8 लीटर) आणि अर्धा गॅलन (1.9 लीटर) च्या पॅकेजिंगमध्ये उपलब्ध असेल. अमेरिकेत फक्त 6% फॅट असलेला अमूल गोल्ड ब्रँड, 4.5% फॅट असलेला अमूल शक्ती ब्रँड, 3% फॅट असलेला अमूल ताजा आणि 2% फॅट असलेला अमूल स्लिम ब्रँड विकला जाईल. हे ब्रँड सध्या ईस्ट कोस्ट आणि मिड-वेस्ट मार्केटमध्ये विकले जातील.

अमूल ही भारत देशामधील एक प्रमुख दूध उत्पादक सहकारी संस्था आहे. १९४६ साली गुजरातच्या आणंद शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली अमूल भारतामध्ये दूध क्रांती घडवून आणण्यासाठी ओळखली जाते. पद्मभूषण त्रिभुवनदास पटेल हे अमूलचे संस्थापक होते. तसेच व्हर्गीज कुरियन ह्यांनी अमूल दूधाला देशभर पोचवण्यात सिंहाचा वाटा उचलला.

SL/ML/SL

24 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *