शेतकरयांना ऊस तोडणीसाठी एकाच दिवशी 90 हार्वेस्टर वाटप
लातूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातल्या सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊसतोड सुलभ व्हावी आणि रोजगार निर्मिती व्हावी यासाठी शेतकरी सभासदांना एकाच दिवशी 90 हार्वेस्टर वाटप करून सहकार क्षेत्रातला नवा पॅटर्न निर्माण केला आहे.Allotment of 90 harvesters on a single day to farmers for sugarcane harvesting
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते कलश पूजन करून हे वाटप काल करण्यात आलं , यावेळी आमदार अमित देशमुख Amit Deshmukh जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख उपस्थित होते. एकाच दिवशी 90 हार्वेस्टर वाटप करणारी महाराष्ट्रातली पहिली जिल्हा बँक लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक ठरली आहे.
या हार्वेस्टर च्या माध्यमातून 3000 लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणारा असून ऊस तोडीच्या माध्यमातून होणारा आर्थिक व्यवहार आता जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला लाभदायक ठरणार आहे.
ML/KA/PGB
8 Nov .2022