#कर्मचारीच खरेदी करणार एअर इंडिया ?

 #कर्मचारीच खरेदी करणार एअर इंडिया ?

नवी दिल्ली,दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सुमारे 90,000 कोटी रुपयांहून अधिक कर्जात बुडालेली सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला आता अडचणींमधून वर येण्यासाठी कर्मचार्‍यांचा एक गट उपयुक्त ठरू शकतो. एका माध्यमातील वृतामध्ये सांगण्यात आले आहे की एअर इंडियाचे काही कर्मचारी आर्थिक भागीदारांसोबत निविदेत भाग घेऊ शकतात. केंद्र सरकारही दीर्घ काळापासून एअर इंडियातील निर्गुंतवणुकीची तयारी करत आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेला आधीच उशीर झाला आहे.
योजनेनुसार अडचणीत आलेली ही विमान कंपनी सद्य परिस्थितीतून सावरण्यासाठी आणि 51 टक्के भागभांडवल प्राप्त करण्यासाठी प्रत्येक कर्मचार्‍याला 1 लाख रुपयांहून अधिक खर्च करावा लागणार नाही. तर अन्य 49 टक्के भागभांडवल गुंतवणूकदारांकडे राहील. संबंधित कर्मचार्‍यांमध्ये वाटण्यात येत असलेल्या एका अंतर्गत पत्रका च्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की या कर्मचार्‍यांच्या एका गटाने एका खासगी इक्विटी फंडाकडे एअर इंडियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी संपर्क साधला आहे. यात कर्मचार्‍यांसाठी 51 टक्के आणि गुंतवणूकदारांसाठी 49 टक्यांची योजना आहे. कर्मचार्‍यांच्या या गटाने खासगी इक्विटी फंड, गुंतवणूक करण्यासाठी यासाठी निवडला आहे कारण त्यांच्याकडे वैयक्तिक स्वरुपात गुंतवणूक करण्याचे साधन नाही.
असे म्हटले आहे की कर्मचार्‍यांना एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) पूर्ण होण्याआधी पैशांची चिंता करावी लागणार नाही. पहिला टप्प्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर एक योजना तयार केली जाईल, ज्यामध्ये कोणत्याही कर्मचार्‍याला एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत.
मात्र या वृत्तात असेही म्हटले आहे की टाटा समूह देखील एअर इंडियामध्ये गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. महाराजा ची संस्थापक स्वतः टाटा समूहच आहे. अशा परिस्थितीत एअर इंडियाची धुरा पुन्हा एकदा टाटा समूहाच्या हाती जाण्याची शक्यता आहे. निविदेसाठी अंतिम मुदत 14 डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर, पात्र निविदाकारांना 28 डिसेंबरपर्यंत निवडीबाबत माहिती दिली जाईल.
Tag – AirIndia/Disinvestment/Employee/Tata
PL/KA/PL/4 DEC 2020

mmc

Related post