# टाटा आणि बिगबास्केट मध्ये सुमारे 10 हजार कोटींच्या कराराबाबत सहमती

 # टाटा आणि बिगबास्केट मध्ये सुमारे 10 हजार कोटींच्या कराराबाबत सहमती

मुंबई, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बिगबास्केट 18 हजारांहून अधिक उत्पादनांची विक्री करतो. अलीकडेच त्याचे एकूण व्यापार मूल्य एक अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले. टाटा समूह सध्याच्या गुंतवणूकदारांकडून 50-60 टक्के हिस्सा खरेदी करू शकेल. ऑनलाइन किराणा कंपनी बिगबास्केटमध्ये जवळपास 80 टक्के भागीदारीसाठी टाटा समूह आधीसूनच सुरु असलेल्या वाटाघाटीच्या अंतिम टप्प्यात आहे. ही हिस्सेदारी सुमारे 1.3 अब्ज डॉलर्सची (9.57 हजार कोटी रुपये) असेल. देशातील सर्वात मोठी ऑनलाईन किराणा कंपनी बिगबस्केटचे एकूण बाजार मूल्य 1.6 अब्ज डॉलर (11.78 हजार कोटी रुपये) आहे.
गेल्या पाच महिन्यांपासूनच्या वाटाघाटीनंतर टाटा समूह आणि बिगबास्केट आता करार रचनेवर सहमत झाले आहेत. कराराच्या प्रस्तावानुसार टाटा समूह सध्याच्या गुंतवणूकदारांकडून सुमारे 50-60 टक्के हिस्सेदारी खरेदी करू शकतो. यात चीनची रिटेल कंपनी अलिबाबा आणि इतर प्रमुख गुंतवणूकदारांचा समावेश आहे.
बिगबास्केटमध्ये चीनची रिटेल कंपनी अलिबाबाची 29 टक्के हिस्सेदारी आहे, ज्याची त्यांना विक्री करायची आहे. बिगबास्केटमधील अन्य बड्या गुंतवणूकदारांमध्ये अबराज समूह (16.3 टक्के), ऍसेंट कॅपिटल (8.6 टक्के), हेलियॉन व्हेंचर पार्टनर्स (7 टक्के), बेसेम्मर व्हेंचर पार्टनर्स (6.2 टक्के) मिराई ऍस्सेट नवर एशिया (5 टक्के ), इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (4.1 टक्के), सँड्स कॅपिटल (4 टक्के) आणि सीडीसी समूह (3.5 टक्के) यांचा समावेश आहे.
वृत्तानुसार टाटा समूह या व्यवहाराद्वारे भारतीय ई-कॉमर्स बाजाराचा मोठा वाटा मिळवणार आहे. यात बिगबास्केट मोठी भूमिका बजावू शकते. कारण, टाटा समूह आपले सुपर अ‍ॅप लवकरच सुरु करणार आहे. अशा परिस्थितीत बिगबास्केटच्या मोठ्या घरगुती वस्तू आणि किराणा उत्पादनांना चांगला आधार मिळू शकेल. अशा परिस्थितीत या व्यवहारामुळे थेट मुकेश अंबानी आणि ऍमेझॉनशी लढत होईल. कारण या दोन्ही कंपन्याही डिजिटल वितरण करतात.
टाटा सन्सच्या वार्षिक बैठकीत कंपनीचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले होते की सुपर अ‍ॅप अंतर्गत अन्न व किराणा, फॅशन, इलेक्ट्रॉनिक, विमा, आर्थिक सेवा, शिक्षण, आरोग्य सेवा आणि देयकाचे भुगतान यासारख्या सेवा दिल्या जातील. फॉरेस्टर रिसर्चनुसार बिगबास्केटवर दररोज सुमारे 3 लाख ऑर्डर नोंदवल्या जातात. 31 मार्चला संपलेल्या वर्षात कंपनीची एकूण विक्री 5,200 कोटी रुपये झाली, ज्यात कंपनीला 920 कोटी रुपयांचा तोटा झाला. मार्च मध्ये कंपनीचे मुल्य 1.23 अब्ज डॉलर होते. ते आता वाढून 1.30 अब्ज डॉलर झाले आहे. कारण, मार्चनंतर ऑनलाइन खरेदी वाढली आहे.
बिगबास्केट 18 हजारांहून अधिक उत्पादनांची विक्री करतो. अलीकडेच त्याचे एकूण व्यापार मूल्य एक अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले. टाळेबंदीच्या आधी फळे आणि भाज्यांची विक्री 16-18 टक्के होती, जी आता 20-22 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. या व्यवहाराशी संबंधित माहिती पुढील काही आठवड्यांत अधिकृतपणे जाहीर केली जाऊ शकते.
Tag- Bigbasket/ Tata /Deal/Online/Grocery
PL/KA/PL/3 DEC 2020

mmc

Related post