‘व्यभिचार’  पुन्हा कायद्याच्या कक्षेत येण्याची शक्यता

 ‘व्यभिचार’  पुन्हा कायद्याच्या कक्षेत येण्याची शक्यता

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क): सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये भारतीय दंड विधान कायद्यातील व्याभिचाराशी निगडित कलम ४९७ काढून टाकले होते. व्याभिचाराबाबत फक्त पुरुषांना शिक्षा देणारे हे कलम असंवैधानिक असल्याचा निकाल न्यायालयाने दिला होता. आता पुन्हा एकदा व्याभिचाराचा समावेश गुन्ह्याच्या कक्षेत करण्याची चर्चा केली जात आहे.

ब्रिटिश काळातील भारतीय दंड संहिता, १८६० या फौजदारी कायद्याला हटवून त्याजागी आता ‘भारतीय न्याय संहिता, २०२३’ हा नवा कायदा आता आणला जाणार आहे. या नव्या कायद्यात व्याभिचाराला पुन्हा गुन्ह्याच्या कक्षेत आणावे, अशी शिफारस गृह व्यवहाराशी संबंधित संसदीय समितीने केली आहे. ‘Adultery’ likely to come under the law again
SL/KA/SL
18 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *