आशियाई विकास बँकेने देशाचा आर्थिक विकास दर पुन्हा कमी केला
नवी दिल्ली, ता.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एकीकडे, सरकार आणि इतर पतमानांकन संस्थांकडून भारताच्या आर्थिक विकास दरात (economic growth rate) सुधारणा करुन तो वाढवण्यात येत आहे तर दुसरीकडे, आशियाई विकास बँकेने (ADB) चालू आर्थिक वर्ष 2021-22 साठी भारताच्या आर्थिक विकास दराचा अंदाज तीन महिन्यांत दुसऱ्यांदा कमी करुन 9.7 टक्के केला आहे.
आशियाई विकास बँकेने (ADB) आपला अहवाल प्रसिद्ध करताना आपला पूर्वीचा अंदाज कमी करण्याचे मुख्य कारण सांगितले. बँकेने सांगितले की यामागे उद्योगासमोरील पुरवठ्याशी संबंधित अडचणी आहेत. पुरवठा साखळीशी संबंधित अडचणींमुळे उद्योगांवर परिणाम होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. मुख्य म्हणजे, यापूर्वी सप्टेंबरमध्ये आपल्या अहवालात, बँकेने 2021-22 मध्ये आर्थिक विकास दर (economic growth rate) 10 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. आशियाई विकास दृष्टीक्षेप 2021 या शीर्षकाच्या अहवालात, बहुपक्षीय संस्थेने 2021 मध्ये दक्षिण आशियाचा विकास दर 8.6 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर सप्टेंबरमध्ये तो 8.8 टक्के रहाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
आशियाई विकास बँकेने (ADB) आर्थिक विकास दराचा (economic growth rate) अंदाज बदलण्याची तीन महिन्यांतील ही दुसरी वेळ आहे. सप्टेंबर महिन्यात, बँकेने कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेच्या प्रतिकूल परिणामांचा संदर्भ देत देशाच्या आर्थिक विकास दराचा अंदाज 10 टक्क्यांपर्यंत कमी केला होता. त्याआधी तो 11 टक्के रहाण्याची अपेक्षा वर्तवली होती. आशियाई विकास बँकेने अहवालात म्हटले आहे की दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या भारताचा आर्थिक विकास दर आता 2021-22 या आर्थिक वर्षात 9.7 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. तो आधीच्या अंदाजापेक्षा 0.3 टक्के कमी आहे.
On the one hand, the government and other credit rating agencies are revising India’s economic growth rate, while on the other hand, the Asian Development Bank (ADB) has cut its economic growth forecast for the current fiscal year 2021-22 to 9.7 per cent for the second time in three months.
PL/KA/PL/15 DEC 2021