संविधान दिनानिमित्त ७५ रुपयांचे विशेष नाणे जारी

 संविधान दिनानिमित्त ७५ रुपयांचे विशेष नाणे जारी

नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ७५ व्या संविधान दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ७५ रुपयांचे विशेष नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरण केले. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहांतील सदस्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात मुर्मू यांनी नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी सभागृहाला संबोधित करताना मुर्मू यांनी ७५ वर्षांपूर्वी ज्यावेळी देशाने संविधानाचा स्वीकार केला तो क्षण ऐतिहासिक होता,असे मुर्मू म्हणाल्या. संविधानाच्या निर्मितीमध्ये महत्वरपूर्ण योगदान देणाऱ्या १५ महिला सदस्यांचा त्यानी आवर्जून उल्लेख केला.
संविधानाला अपेक्षित असलेल्या तत्वांचे आपल्या जीवनात अवलंब करून आणि संविधानाने आखून दिलेल्या कर्तव्यांचे पालन करून सन २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन राष्ट्रपती मुर्मू यांनी याप्रसंगी केले.

SL/ML/SL

26 Nov 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *