पूजा खेडकरला वैद्यकीय प्रमाणपत्र देणारे एक डॉक्टर ठरले निर्दोष….
पुणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :यूपीएससीकडून कारवाई करण्यात आलेली वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकर हिच्याबद्दल आणखी एक माहिती पुढे येत आहे. पुजाने जे प्रमाणपत्र पिंपरी चिंचवडच्या वायसीएम हॉस्पिटलमधून मिळवले होते, ते प्रमाणपत्र देणारे डॉक्टर तपासात निर्दोष सापडले आहेत .
त्या प्रमाणपत्रावर तिला ना शिक्षणात लाभ घेता येत होता ना नोकरीत. त्यामुळे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर निर्दोष असल्याचा संबधित रुग्णालयाचा रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला आहे. पूजा खेडकर हिच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलला दिले होते त्या आदेशानुसार वायसीएम हॉस्पिटलमधील डॉक्टर हे निर्दोष असल्याची टिपण्णी हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे यांनी केली आहे .
आम्ही संबंधित डॉक्टरांकडून पूजा खेडकर हिच्या दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल अहवाल मागितला होता. त्यात त्यांनी पूजा खेडकरची योग्य तपासणी करून शासकीय निकषानुसार तिला 7% दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. मात्र त्या प्रमाणपत्राच्या आधारे तिला शिक्षणात किंवा शासकीय नोकरीत कोणताही लाभ घेता येत नाही असे स्पष्टीकरण वायसीएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे यांनी दिले आहे.
ML/ML/PGB
24 July 2024