आषाढीसाठी विठोबाचे 24 तास दर्शन सुरू…

 आषाढीसाठी विठोबाचे 24 तास दर्शन सुरू…

पंढरपूर दि २७:- आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी विठोबाचे आज पासून 24 तास दर्शन सुरू झाले आहे. परंपरेप्रमाणे आषाढ महिना सुरू झाल्यावर आज विठोबाचा पलंग काढण्यात आला. यावेळी विठोबाचे नवरात्र बसते असे मानले जाते यानंतर विठोबाचे सर्व राजोपचार बंद करून देव आपल्या लाडक्या भक्तांना 24 तास दर्शन देण्यासाठी उभा असणार आहे. आषाढी नंतरच्या 16 जुलै रोजी होणाऱ्या प्रक्षाळ पूजेपर्यंत 24 तास दर्शन सुरू असणार आहे. सध्या मंदिर समितीच्या वतीने 50000 भाविक उभारतील इतकी मोठ्या क्षमतेची दर्शन रांग उभा करण्यात आली आहे. तर प्रति मिनिटाला 35 भाविक दर्शन घेतील असे नियोजन आहे. एकंदर 24 तास दर्शन सुरू झाल्यापासून व्हीआयपी दर्शन, आणि ऑनलाईन दर्शन बुकिंग व्यवस्था पूर्णपणे बंद करून सर्वसामान्य भाविकांना सहज दर्शना देण्याबाबत प्रशासनाने नियोजन केले आहे. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *