अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्ट व मनपा पी विभाग आयोजित पर्यावरण दिन उत्साहात संपन्न!

 अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्ट व मनपा पी विभाग आयोजित पर्यावरण दिन उत्साहात संपन्न!

मुंबई, दि 6: वृक्षारोपण आणि झाडांचे संवर्धन केलेच पाहिजे, तरच आपण प्रदूषण युक्त वातावरणातून बाहेर पडून वृक्षांच्या सानिध्यात मोकळा स्वास घेऊ शकतो. या हेतूने अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्ट व मनपा पी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, पर्यावरण दिना निमित्त, गोरेगाव पूर्व येथील रहेजा गार्डन येथे वृक्षारोपण सोहळा आयोजित केला होता.
या कार्यक्रमात अंध बांधव व ज्येष्ठ नागरिकांनी वृक्षारोपण करून निसर्गाप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.
‘ एक पेड माँ के नाम ” या संकल्पनेतून “झाडें लावा, झाडें जगवा ” हा उपक्रम राबविण्यात आला.


अनिर्वेद चॅरिटेबल ट्रस्ट च्या संचालिका – अंजली सरकाळे, ट्रस्टी सचिन सरकाळे,
अध्यक्षा – अश्विनी बोरगावकर, समाज सेवक – संतोष रहाटे, अनंत दाभोळकर, सिने कलाकार
संदीप फाटक, उपस्थित होते.
अंध बाधवानी स्वतःच्या हाताने झाडे लावण्याचा आनंद घेऊन, स्पर्श ज्ञानाच्या मदतीने त्यांनी रोपांची माहिती करून घेतली. त्यांच्या चेह-या वरील समाधान आणि उत्साह उपस्थितानाही खूप आनंद झाला.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *