इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापासून क्रिटिकल अर्थ मिनरल्स

 इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापासून क्रिटिकल अर्थ मिनरल्स

नागपूर दि १०– भारतीय खाण ब्युरो (IBM), राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) च्या सहकार्याने हॉटेल रेडिसन ब्लू, नागपूर येथे “खाणीतील कचऱ्यापासून दुर्मिळ खनिजे काढणे – संधी आणि आव्हाने” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राला संबोधित करतांना भारतीय खाण ब्युरो आयबीएम नागपूरचे प्रभारी महा नियंत्रक पी . एन . शर्मा यांनी सांगितले की देशात मोठ्या प्रमाणात जमा होत असलेला इलेक्ट्रॉनिक कचऱ्या पासून क्रिटिकल अर्थ मिनरल्स मिळवता येतात.

देशांमधील खाणींच्या माध्यमातून उत्खनन झाल्यानंतर उरलेल्या अविशिष्ट कचऱ्यापासून क्रिटिकल अर्थ मिनरलचे खनन होत असते. या क्रिटिकल अर्थ मिनरल च्या उत्खननामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात असून या खनिजांपासून उत्तम प्रतींचे धातूके निर्माण होतात ज्यांचा वापर अणुऊर्जा तसेच इतर महत्त्वाच्या क्षेत्रात केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं .

या चर्चासत्रात सरकार, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि संशोधन संस्थांमधील भागधारकांना
महत्वाच्या खनिजांच्या पुनर्प्राप्तीसाठी संभाव्य संसाधन आधार म्हणून खाण कचरा ‘महत्वाच्या खनिज खाणकाम आणि प्रक्रियेतील धोरणात्मक चौकटी आणि नियामक मुद्दे या विषयावर विविध तांत्रिक सत्राद्वारे चर्चा झाली.

ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *