राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त विशेष ‘पोस्टल स्टॅम्प’चे अनावरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौंडी, अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त विशेष ‘पोस्टल स्टॅम्प’चे अनावरण केले. या विशेष टपाल आवरणाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.
ML/MS