तापमानाच्या उच्चांकमुळे ताडोबा दुपार सफारीच्या वेळेत बदल

चंद्रपूर दि २५:– चंद्रपुरात तापमानाच्या उच्चांकामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दुपार सफारीच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. दुपारची सफारी २:३० ते ६:३० वाजता ऐवजी आता दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजता अशी करण्यात आली आहे. हा बदल १ मेपासून करण्यात येणार होता. पुढील आदेशापर्यंत नव्या वेळेनुसारच सफारी होणार आहे. सकाळच्या सफारीत कोणताही बदल झालेला नाही. चंद्रपूर जिल्ह्यात आतापासूनच सूर्य आग ओकत आहे. मे महिना अजून बाकी आहे. मे महिन्यात चंद्रपुरात सूर्याचा पारा आणखी वाढत जाईल, अशी भीती वर्तविली आहे.