Transparency International ने जाहीर केली सर्वाधिक भ्रष्ट देशांची यादी

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील बहुतांश देशांमध्ये भ्रष्टाचाराच्या राक्षसाने हातपाय पसरले आहेत. देश गरीब असो वा श्रीमंत, मागास असो वा विकसित कमीजास्ती प्रमाणात भ्रष्टाचार सर्वत्रच आढळून येतो. या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी Transparency International ही संस्था दरवर्षी जगातील सर्वांधिक भ्रष्ट देशांची यादी जाहीर करते. करप्शन परसेप्शन इंडेक्स (CPI) २०२४ ची क्रमावारी नुकतीच जाहीर करण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या पातळीच्या आधारे १८० देशांची क्रमवारी जाहीर केली जाते. या देशांना ० ते १०० या दरम्यान गुण दिले जातात. ज्यामध्ये सर्वाधिक गुण मिळवणारा देश हा इमानदार देश असतो तर सर्वात कमी गुण मिळवणारा देश हा भ्रष्ट देश जाहीर केला जातो.
२०२४ मध्ये सूदान हा जगातील सर्वात भ्रष्टाचारी देश ठरला आहे . या देशाला केवळ ८ गुण मिळाले आहेत. या यादीत १८० क्रमांक मिळालेला देश आहे. त्यानंतर सोमालिया १७९ क्रमांक, व्हेनेझुएला १७८ क्रमांक, सिरिया १७७ क्रमांकांवर आहेत.
सर्वात कमी ज्या देशात भ्रष्टाचार होतो अशा देशांमध्ये डेनमार्कने सलग ७ व्या वर्षी अव्वल स्थान पटकावले आहे. सीपीआय प्रमाणे ९० गुण प्राप्त केले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर फिनंलँड (८८) तिसऱ्या कम्रांकावर सिंगापूर (८४) चौथ्या क्रमांकावर न्युझीलंड (८३), ८१ गुणांसहित लग्जमबर्ग, नॉर्वे, स्वित्झर्लंड संयुक्तरित्या पाचव्या स्थानावर आहे.
भारत या यादीत ९६ क्रमांकावर आहे. भारताला ३८ गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षी जाहीर झालेल्या यादीत भारत हा ९३ व्या क्रमांकावर होता. त्यामुळे ३ क्रमांकाने घसरण झाली आहे. पाकिस्तान २७ गुणांसहित १३५ क्रमांकावर आहे. चीन ४२ गुणांसहित ७६ व्या क्रमांकावर आहे.
SL/ML/SL
12 Feb. 2025