भारतीय स्टेट बँकेच्या अर्थतज्ञांनी कमी केला विकास दराचा अंदाज

 भारतीय स्टेट बँकेच्या अर्थतज्ञांनी कमी केला विकास दराचा अंदाज

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) अर्थतज्ञांनी चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये सकल देशांतर्गत उत्पादनाच्या विकास दराचा (GDP Growth rate) अंदाज कमी करुन 7.9 टक्के केला आहे. याआधी त्यांनी 10.4 टक्क्यांच्या विकास दराचा अंदाज व्यक्त केला होता. सर्व विश्लेषकांमधील हा सर्वात कमी विकास दर आहे. सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बँकेच्या अर्थतज्ञांनी सांगितले की कोरोना संसर्गाची दुसरी लाट विकास दराच्या अंदाजातील मोठ्या कपातीचे मुख्य कारण आहे.

साथीचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार
pandemic will have a major impact on the economy

अर्थतज्ञांच्या अहवालात म्हटले आहे की या वेळी साथीचा अर्थव्यवस्थेवर (economy) अधिक व्यापक परिणाम होईल. शहराच्या तुलनेत ग्रामीण अर्थव्यवस्थेत फारसा संघर्ष दिसून येत नाही. मागणी दबल्यामुळे चालू आर्थिक वर्षातील जीडीपीच्या (GDP) अंदाजांवर परिणाम होणार नाही. अर्थतज्ज्ञांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय स्तरावर वस्तूंच्या किंमती वाढत आहेत, त्याचा परिणाम जीडीपीच्या विकास दरावर (GDP Growth rate) होईल. एकूण वापर व्यापार, हॉटेल, वाहतूक, संप्रेषण आणि सेवांच्या पुनरुज्जीवनावर अवलंबून असेल. सुमारे 25 कोटी कुटुंबांची उपजीविका याच क्षेत्रांवर अवलंबून आहे.

‘डब्ल्यू’ आकारात होईल सुधारणा
There will be an improvement in the shape of ‘W’

त्यांनी सांगितले की, 145.8 लाख कोटी रुपयांसह चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 2019-20 च्या तुलनेत थोडे जास्त असेल. अर्थशास्त्रज्ञ म्हणाले की, अर्थव्यवस्थेतील सुधारणा ‘डब्ल्यू’ आकारात होईल. आधी अर्थव्यवस्था ‘व्ही’ आकाराने सुधारण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

डब्ल्यू आकार म्हणजे काय?
What is the W shape?

डब्ल्यू-आकाराच्या सुधारणेचा अर्थ असा आहे की अर्थव्यवस्थेमध्ये घट झाल्यानंतर सुधारणा आणि त्यानंतर अर्थव्यवस्थेत (economy) पुन्हा तीव्र घट आणि तीव्र सुधारणा. मात्र कोव्हिड-19 ची (covid-19) दुसरी लाट असतानाही रिझर्व्ह बँकेने (RBI) चालू आर्थिक वर्षाच्या विकास दराचा (GDP Growth rate) अंदाज 10.5 टक्के कायम ठेवला आहे.

मूडीजनेही व्यक्त केला अंदाज
Moody’s also predicted

मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने म्हटले आहे की, मार्च 2022 ला समाप्त होणार्‍या चालु आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी विकास दर (GDP Growth rate) 9.3 टक्के राहू शकेल तर पुढील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये तो 7.9 टक्के रहाण्याचा अंदाज आहे. संसर्गाच्या भीतीमुळे लोकांच्या वागण्यात बदल होण्यासह टाळेबंदी पुन्हा लागू केल्यामुळे आर्थिक घडामोडींवर अंकूश येईल, मात्र हा परिणाम आधीच्या लाटेइतका तीव्र होण्याची अपेक्षा नाही.
सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्था (economy) 1.6 टक्क्यांनी वाढली आहे. 2020-21 या संपूर्ण आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था 7.3 टक्क्यांनी घसरली आहे.
State Bank of India (SBI) economists have cut their GDP growth forecast to 7.9 per cent for the current financial year 2021-22. Earlier, they had projected a growth rate of 10.4 per cent. This is the lowest growth rate among all analysts.
PL/KA/PL/2 JUNE 2021

mmc

Related post