Cold Play च्या ख्रिस मार्टीनने ‘या कारणासाठी’ मागितली भारतीयांची माफी, व्हिडिओ व्हायरल
Cold Play बॅंडने सध्या मुंबईत धुमाकूळ घातला आहे. दोन दिवस त्यांच्या गाण्यांनी मुंबईकरांची मने जिंकली. पण गाण्याव्यतिरिक्त गायक ख्रिस मार्टीनने केलेल्या व्यक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे. ख्रिस मार्टिनच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कॉन्सर्टमध्ये चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. इतकेच नाही तर, ख्रिसने ब्रिटनच्या राजवटीबद्दल भारतीय चाहत्यांची माफी मागितली. कॉन्सर्ट दरम्यान चाहत्यांशी संवाद साधताना “ब्रिटनने केलेल्या सर्व वाईट गोष्टी” माफ केल्याबद्दल धन्यवाद म्हणत त्याने उपस्थितांची मनं जिंकली आहेत. ब्रिटिशांनी भारतासोबत अन्याय-अत्याचार केल्यानंतरही तुम्ही आम्हाला माफ केले, याबद्दल मी आपला आभारी असल्याचेही त्याने म्हटले आहे. ख्रिसचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.