New Year पार्टीआधी पुण्यातल्या पबने काय वाटले असेल? अवघड आहे सगळंच ! काय ते वाचा

नववर्षाच्या स्वागतासाठी आता ठिकठिकाणी पार्टी आयोजित केल्या जातात. अशावेळी गिफ्ट्स वगैरे दिले जातात. आता तर विविध पब्जमध्येही दणक्यात पार्टी साजरी होते. पण पुण्यातल्या एका पबने ३१ डिसेंबरच्या पार्टी आधी जे केलंय ते वाचून अवघड आहे पुढचं सगळं असंच म्हणावसं वाटेल. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पब कडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी कंडोम आणि ORSचे पाकीट देण्यात आले आहे. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ORSचे पाकीट देणार असल्याचा दावा या पबने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब नोंदवले गेले आहेत. या पब व्यव्यस्थापकडून पोलिसांनी याची माहिती घेतली आहे. मात्र, कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे