मार्च तिमाहीत जीडीपी विकास दर 1.3 टक्के राहील – एसबीआय रिसर्च
नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मागील आर्थिक वर्ष 2020-21 च्या चौथ्या तिमाहीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाचा विकास दर (GDP Growth Rate) 1.3 टक्के राहील. एसबीआय रिसर्चचा (SBI Research ) अहवाल इकोरॅपमध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अहवालात सांगण्यात आले आहे की गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था (economy) सुमारे 7.3 टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) मार्च तिमाहीचा आणि 2020-21 साठीच्या जीडीपीचा प्राथमिक अंदाज 31 मे रोजी जाहीर करेल.
आधी 7.4 टक्के घसरणीचा अंदाज होता
previously It was forecast to fall 7.4 percent
अहवालात पुढे असे सांगण्यात आले आहे की, आमच्या नॉकास्टिंग मॉडेलनुसार, चौथ्या तिमाहीत जीडीपी विकास दर (GDP Growth Rate) 1.3 टक्के रहाण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) चौथ्या तिमाहीत एक टक्का घट होण्याची शक्यता वर्तविली आहे. 2020-21 च्या संपूर्ण आर्थिक वर्षात जीडीपीत सुमारे 7.3 टक्क्यांनी घसरण होईल, असे अहवालात म्हटले आहे. त्याआधी त्यांनी संपूर्ण आर्थिक वर्षात 7.4 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तवला होता.
41 उच्च चक्रीय निर्देशकांवर आधारित नॉककास्टिंग मॉडेल
Knockcasting model based on 41 high cyclic indicators
कोलकाता येथील स्टेट बँक इंस्टिट्यूट ऑफ लीडरशिप (एसबीआयएल) च्या सहकार्याने भारतीय स्टेट बँकेने (SBI) एक ‘नाऊकास्टिंग मॉडेल’ विकसित केले आहे, जे औद्योगिक घडामोडी, सेवा घडामोडी आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या 41 उच्च चक्रीय निर्देशकांवर आधारित आहे. .
भारत पाचव्या क्रमांकाची वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असेल
India will be the fifth fastest growing economy
अहवालात सांगण्यात आले आहे की 1.3 टक्क्यांच्या विकास दराच्या (GDP Growth Rate) अंदाजाच्या आधारे भारत 25 देशांमध्ये पाचव्या क्रमांकाची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था (economy) ठरेल. या 25 देशांनी त्यांचे जीडीपीचे आकडे जाहीर केले आहेत.
ऑनलाईन स्टोअर्सकडून जास्त किंमतीला वस्तूंची विक्री
Selling items at higher prices from online stores
त्याआधी एसबीआय रिसर्चने आपल्या एका अहवालात म्हटले होते की कोरोना साथीमध्ये एका बाजूला ग्राहक जिथे बहुतेक खरेदी ऑनलाईन करत आहेत, या संधीचा फायदा घेत ग्रोफर्स, नेचर बास्केट, लिशियस यासारख्या प्लॅटफॉर्मने अधिक किंमतीला उत्पादनांची विक्री करण्यास सुरवात केली आहे. बहुतांश ऑनलाईन स्टोअरनी साथीच्या काळात सवलतीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे.
अहवालानुसार, कोरोनापूर्वी ऑनलाईन स्टोअरमध्ये विकल्या जाणार्या वस्तूंच्या किंमती त्यांच्या कमाल किरकोळ किंमतीपेक्षा (एमआरपी) खुप कमी असायच्या कारण दुकानांशी स्पर्धा आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जास्त सवलत दिली जात होती. आता संसर्गाची भीती आणि टाळेबंदीमुळे बहुतांश ग्राहकांनी ऑनलाइन खरेदी सुरू केली आहे, त्यामुळे सवलतीमध्ये कपात करण्यात आली आहे.
In the fourth quarter of the previous fiscal, 2020-21, the country’s GDP growth rate will be 1.3 per cent. This is stated in the SBI Research report EcoRap. According to the report, the Indian economy is projected to grow by about 7.3 per cent in the last full financial year.
PL/KA/PL/26 MAY 2021