#अर्थव्यवस्था रुळावर परतत आहे
नवी दिल्ली, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थशास्त्रज्ञ सध्या कोरोना कालावधीत सकल देशांतर्गत उत्पादनाचे (जीडीपी) नुकसान मोजण्यात व्यस्त आहेत. भारताच्या केंद्रीय सांख्यिकी संघटनेने (सीएसओ) जुलै ते सप्टेंबर दरम्यान जीडीपीमध्ये 15.7 टक्क्यांची (वार्षिक आधारावर) घट मोजली. त्याआधी सीएसओने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीच्या 23.9 टक्क्यांच्या घसरणीचा अंदाज व्यक्त केला होता. केंद्र सरकारचे माजी मुख्य सांख्यिकी अधिकारी प्रणव सेन यांनी सांगितले आहे की देशाच्या जीडीपीमध्ये जवळपास 10 टक्क्यांची घसरण होऊ शकते आणि त्यांच्या मते बृहद आर्थिक स्थिती खुपच अनिश्चित आहे. रिझव्र्ह बँकेने मात्र यावर्षी सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये 7.5 टक्क्यांची घट येण्याचा अंदाज वर्तविला आहे.
यावर्षी आर्थिक घडामोडी, विशेषत: उत्पादन आणि सेवांवर वाईट परिणाम झाला आणि साथीमुळे लोकांची वर्दळ कमी झाली, अशा परिस्थितीत जीडीपीमध्ये घट होणे स्वाभाविक होते. केवळ शेती हेच एकमेव क्षेत्र असे होते ज्यावर साथीचा परिणाम झाला नाही. मागील दोन तिमाहीत कृषी क्षेत्रामध्ये 3.4 टक्के (दोन्ही तिमाही) सकारात्मक वाढ झाली आहे, तर उत्पादनात 39.3 टक्के आणि 0.6 टक्के घट झाली आहे. व्यापार, हॉटेल, वाहतूक आणि दळणवळणात अनुक्रमे 47 आणि 15.6 टक्के घट झाली.
तिसर्या तिमाहीत आर्थिक घडामोडी सुरू झाल्या आहेत. मागणी वाढत आहे आणि अनेक अडचणी दूर होत आहेत. यावरुन असा निष्कर्ष काढला जाऊच शकतो की सुमारे चार महिन्यांच्या तीव्र आर्थिक संकटा नंतर भारतीय अर्थव्यवस्थेत पुन्हा एकदा चमक येत आहे. अर्थव्यवस्था वेगाने पुनरागमन करीत आहे यावर आर्थिक विश्लेषकांचे एकमत आहे. बहुतेकांचा अर्थव्यवस्था व्ही-आकाराने सुधारत आहे असा दृष्टीकोन आहे, तर काहींना यू-आकाराच्या पुनरागमनाची अपेक्षा आहे. पुनरागमनाचा आकार काहीही असो अर्थव्यवस्था निश्चित रुपाने सावरत आहे. मागणीमध्ये तेजी हे पुनरागमनाचे एक कारण आहे. टाळेबंदी आणि त्यानंतरच्या आर्थिक घडामोडींध्ये घट झाल्यामुळे लुप्त झालेली मागणी परत येत आहे. देशांतर्गत उत्पादनास प्रोत्साहित करण्यासाठी सरकारकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे देखील सुधारणा अपेक्षेपेक्षा वेगाने होत आहे. तिसरे म्हणजे आत्मनिर्भरतेला प्रोत्साहित करण्याच्या नवीन धोरणाने विशेषत: चीनकडून होणारी आयात निरुत्साहित करुन देशांतर्गत उत्पादनास चालना दिली आहे. चौथा मुद्दा, आंतरराष्ट्रीय स्तरावरही पुनर्प्राप्ती अपेक्षेपेक्षा वेगाने होत असल्याचे दिसत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत वेगाने आर्थिक सुधारणा आणि साथीशी संबंधित बेरोजगारी कमी होऊ शकते असे मानले जात आहे.
एका शतकाहून अधिक कालावधीनंतर जगाने एक साथ पाहिली आहे, त्यामुळे विकास दरात झालेली घट सामान्य दृष्टीने पाहणे शहाणपणाचे ठरणार नाही. साथीपासून धडा घेत 2020 ला मागे सारुन एक मोठी झेप घेण्याची गरज आहे. ग्रामीण स्तरावर दुग्धशाळा, कुक्कुटपालन, फलोत्पादन, फळबाग, बांबुची शेती, कुटीर उद्योग, खाद्य प्रक्रिया, उच्च मुल्य असलेली पिके आणि ग्रामीण स्तरावर अधिक मुल्यवर्धनासह रोजगार निर्माण करून स्वावलंबी खेड्यांच्या नव्या युगात प्रवेश करण्याची ही वेळ आहे. आपल्या ग्रामीण भागातील लोकांना शहरांमध्ये स्थलांतर करण्यास भाग पडू नये अशी नवी व्यवस्था तयार केली पाहिजे. आपला देश उत्पादनाच्या बाबतीत चीन किंवा अन्य कोणत्याही देशावर अवलंबून राहू नये. चीनपासून निराश झाल्यानंतर संपूर्ण जग भारताकडे एक पर्याय म्हणून पहात आहे. अशा परिस्थितीत संकटांला संधीमध्ये रुपांतरित करण्याची आवश्यकता आहे.
Tag-India/Economy/Back on Track
PL/KA/PL/31 DEC 2020