सर्वात स्लीम आणि फोल्डेबल फोन झाला लाँच

 सर्वात स्लीम आणि फोल्डेबल फोन झाला लाँच

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Vivo कंपनीने पहिल्यांदाच भारतात फोल्डेबल स्मार्टफोन सादर केला आहे. Vivo X Fold 3 Pro भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8.03 इंचाचा E7 AMOLED प्रायमरी डिस्प्ले आणि 5,700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. एक्स फोल्ड 3 प्रो मध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 8.03 इंचाचा AMOLED इनर डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 14 आधारित Funtouch OS 14 वर चालतो. Vivo X Fold 3 Pro मध्ये ऑक्टा कोर Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 16GB LPDDR5X RAM आणि 512GB UFS4.0 इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे.

भारतात Vivo X Fold 3 Pro चा एकच व्हेरिएंट लाँच करण्यात आला आहे, ज्यात 16GB रॅम सह 512GB स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची किंमत 1,59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा सेलेस्टियल ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. सध्या हा हँडसेट Vivo इंडिया वेबसाइट, अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे आणि याची विक्री 13 जूनपासून सुरु होईल. फोटोग्राफीसाठी Vivo X Fold 3 Pro मध्ये Zeiss सपोर्टसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 64 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, जीपीएस, BeiDou, GLONASS, Galileo, QZSS, NavIC, A-GPS, OTG आणि यूएसबी टाइप सी पोर्ट आहे. Vivo च्या या फोनमध्ये 5,700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे

लाँच ऑफर अंतर्गत Vivo एचडीएफसी आणि एसबीआय कार्डने पेमेंट केल्यास 15,000 रुपयांची बँक ऑफर देण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना 10 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि एकदा मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट करता येईल. तसेच 24 महिन्यापर्यंत नो-कॉस्ट ईएमआय ऑप्शन देखील आहे.

SL/ML/SL
6 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *