आषाढी वारीसाठी संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे 28 जूनला प्रस्थान
छ. संभाजीनगर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत एकनाथ महाराजांची पालखी छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथून पंढरपूर येथे जात असते. यंदाही पालखी 28 जून रोजी पैठण येथून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार आहे . या सर्व नियोजनाची तयारी करण्यात येत आसल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी दिली आहे.
नाथ महाराज पालखीचे 28 जून रोजी प्रस्थान होणार आहे.तर पुढील 19 दिवसाचा पायी प्रवास करून 16 जुलै रोजी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे.यासाठी मराठवाड्यातील दिंड्यासाठी प्रशासनाने बैठक घेऊन वारकर्यांना सुविधा द्यावी अशी मागणी रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी केली आहे.
ML/ML/SL
26 May 2024