लग्नाआधी वऱ्हाड पोहोचलं मतदान केंद्रावर

बुलडाणा, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज मतदानाला सुरुवात झाली. शेगाव येथील नवरदेव लग्नासाठी वऱ्हाड घेऊन थेट मतदान केंद्रावर पोहोचला. त्याच्यासह वऱ्हाडानं मतदानाचा हक्क बजावला.
बुलडाणा लोकसभा मतदारसंघात आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. निवडणुकीच्या मुहूर्तासह आज मोठ्या संख्येनं लग्नदेखील आहेत. यामध्ये शेगाव येथील रेल्वे गेट परिसरातील नवरदेव लग्नासाठी वऱ्हाड घेऊन संग्रामपूर तालुक्यातील टूनकी इथं इथं पोहोचणार होता. मात्र, त्यापूर्वी त्यानं बुरुंगले विद्यालयातील मतदान केंद्रावर वऱ्हाडासह मतदान केंद्रावर पोहोचून त्यानं मतदानाचा हक्क बजावला आहे.
ML/ML/SL
26 April 2024