UPSC चा निकाल जाहीर; आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम

 UPSC चा निकाल जाहीर; आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या CSE Mains २०२३ चा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात लखनौचा आदित्य श्रीवास्तव (Aditya Srivastava) याने प्रथम क्रमांक (AIR2) पटकावला आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अनिमेश प्रधान आहेत, त्यानंतर डोनुरु अनन्या रेड्डी तिसऱ्या स्थानावर आहे. पीके सिद्धार्थ रामकुमार चौथ्या तर रुहानी पाचव्या स्थानावर आहे.

UPSC परीक्षेमध्ये टॉप रँकमध्ये मुलांचं वर्चस्व दिसून येत आहे. या निकालात महाराष्ट्रातील उमेदवारांनीही उत्तम कामगिरी केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ऑल इंडिया रॅंकींनुसार अर्चित डोंगरेला १५३ रँक मिळाली आहे. पहिल्या १०० जणांच्या यादीमध्ये अनिकेत हिरडे ८१ व्या रँकवर आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत महाराष्ट्रातील ७० उमेदवार यशस्वी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत UPSCमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

यंदा यूपीएससीच्या परीक्षांमध्ये १०१६ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ३४७ उमेदवार खुल्या प्रवर्गाचे, ११६ उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे, ३०३ उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे, १६५ उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गाचे तर ८६ उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत. गेल्या वर्षी हेच प्रमाण खुला प्रवर्ग – ३४५, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग – २८, ओबीसी – ५२, अनुसूचित जाती – ५ तर अनुसूचित जमाती – ४ असं होतं.

SL/ML/SL

16 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *