महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

 महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी निर्दोष सुटका झालेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे याच प्रकरणी पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडून भुजबळांची निर्दोष सुटका झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हस्तक्षेप करत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यायाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यामुळे नाशिक लोकसभेची तयारी करणाऱ्या व्यस्त असलेल्या छगन भुजबळांच्या चिंतेत वाढ होणार आहे.

छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना जारी करण्यात आलेल्या विविध कंत्राटामधून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना रोखरक्कम लाचेच्या स्वरुपात मिळाल्याचा आरोप होता. महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने भुजबळां विरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये दोन गुन्हे दाखल केले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी छगन भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी देखील दोषमुक्त करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली होती. भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका केली होती. आता या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.

या प्रकरणी अंजली दमानिया यांनी X मिडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांना निर्दोष सोडण्यात आलं होतं. या प्रकरणातील डिस्चार्जला आव्हान देणारे अपील गेली दीड वर्ष ऐकले जात नव्हते. पाच न्यायाधीशांनी ‘नॉट बिफोर मी’ असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयासमोर एक SLP करून त्यावर ओरडी घेऊन, माननीय CJ यांना योग्य न्यायाधीशांसमोर त्याची लिस्टिंग करण्यासाठी विनंती करण्याचे आदेश मिळाले आहेत. शेवटी प्रकरण उद्या अनुक्रमांक १२ वर न्यायमूर्ती मोडक यांच्यासमोर ठेवण्यात आले आहे.

SL/ML/SL

31 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *