६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांसाठी प्रवेशिका

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांसाठी २०२२ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका १६ एप्रिलपर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हा मानाचा आहे. राज्य शासनाच्या वतीने या पुरस्कारासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव (पूर्व), मुंबई-६५ येथील जनसंपर्क विभागात कार्यालयीन वेळेत प्रवेशिका उपलब्ध आहेत. तसेच याच ठिकाणी विहित मुदतीत प्रवेशिका सादर करायच्या आहेत. याबाबत www.filmcitymumbai.org या संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध आहे Entries for the 60th Maharashtra State Marathi Film Awards.
PGB/ML/PGB
25 March 2024