गेल्या पन्नास वर्षांतील सर्वांत मोठे सूर्यग्रहण लवकरच

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सूर्यग्रहण म्हणजे जगभरातील खगोलप्रेमींसाठी पर्वणीच असते. काही खगोल अभ्यासक तर सूर्यग्रहण नीट पाहता यावे यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवासही करतात. वर्ष २०२४ मधले पहिले आणि गेल्या पन्नास वर्षांतील सर्वांत मोठे सूर्यग्रहण येत्या फाल्गुन अमावास्येला (८ एप्रिल ) होणार आहे. विशेष म्हणजे हे खग्रास सूर्यग्रहण आहे. हे खग्रास सूर्यग्रहण असल्याने सूर्य पूर्णपणे झाकला जाणार आहे. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजून १२ मिनिटींनी होणार असल्याने भारतातून दिसणार नाही
ग्रहणाच्या दिवशी सूर्यापासून पृथ्वी आणि चंद्राचे सरासरी अंतर सुमारे १५ कोटी किमी असेल. यामुळे हे सूर्यग्रहण तब्बल साडेसात मिनिटे अनुभवता येणार आहे. याआधी आफ्रिकन महाद्विपामध्ये १९७३ मध्ये एवढे दीर्घकाल सूर्यग्रहण दिसले होते.
हे सूर्यग्रहण अमेरिकेच्या 13 राज्यांमध्ये दिसणार आहे, याशिवाय कॅनडा आणि मेक्सिकोमध्येही दिसणार आहे. हे सूर्यग्रहण दक्षिण-पश्चिम युरोप, ऑस्ट्रेलिया, पश्चिम आशिया, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, इंग्लंड आणि आयर्लंडच्या उत्तर पश्चिम भागात दिसणार आहे.
8 एप्रिल रोजी होणारे सूर्यग्रहण अनेक कारणांसाठी खास आहे. या खगोलीय घटनेदरम्यान सूर्य त्याच्या क्रियाकलापाच्या शिखरावर असेल. शास्त्रज्ञांना आशा आहे की यावेळी सूर्यग्रहणात कोरोना खूपच वेगळा असेल. नासाच्या माहितीनुसार संपूर्ण उत्तर अमेरिकेत हे सूर्यग्रहण दिसणार आहे. 2017 नंतर अमेरिकेतील हे पहिले संपूर्ण सूर्यग्रहण आहे. ते मेक्सिकोमधील पॅसिफिक किनारपट्टीवर सकाळी 11:07 वाजता प्रथम दिसेल. अमेरिकेतील 13 राज्यांमध्ये ते दिसणार आहे.
SL/ML/SL
18 March 2024