चिनी तरुणांमध्ये वाढतोय सोन्यामध्ये गुंतवणूकीचा ट्रेंड

बिजिंग, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
आजवरचा सोने खरेदीचा जागतीक ट्रेड पाहता मध्यमवयीन किंवा वृद्ध व्यक्ती गुंतवणुकीसाठी सोने खरेदीला प्राधान्य दित असल्याचे दिसून आले आहे. मात्र जागतिक सुवर्ण परिषदेच्या नुकत्यात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार चिनमधील तरुणाई सध्या मोठ्या प्रमाणात सोने गुंतवणूकीमध्ये रस घेताना दिसून येत आहे. गेल्या १५ वर्षांतील सर्वात मोठी मंदी, अस्थिर शेअर बाजार आणि बँकांच्या व्याजदरात झालेली कपात या पार्श्वभूमीवर चिनी तरुणांमध्ये आता सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची क्रेझ वाढल्याचे दिसत आहे. चीनमधील तरुणांमध्ये ब्रँडेड फोन, महागड्या बाइक्स व कारची क्रेझ नसून ‘गोल्ड बीन्स’ची आहे. या बीन्सचे वजन १ ग्रॅमपर्यंत असते. कॉलेजमधील नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आणि मित्रांचे मन वळवण्यासाठी येथील Gen- Z या भेटवस्तू म्हणून देत आहेत. विशेष बाब म्हणजे तरुण मंडळी मौजमजा आणि पार्ट्यांचे आकर्षण सोडून दागिन्यात गुंतवणूक करत आहेत.
जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार, सोन्याचे तीन चतुर्थांश ग्राहक हे २५ ते ३५ वयोगटातील आहेत. बदलता ट्रेंड लक्षात घेऊन बँकाही पारंपरिक सोने विक्रेत्यांच्या सहकार्याने अशा बीन्सची विक्री करत आहेत. चायना मर्चंट्स बँकेनेही अलीकडेच आपली नवीन श्रेणी सुरू केली आहे. वाढत्या वापरादरम्यान चीन आता स्वित्झर्लंडनंतर सोन्याचा जगातील दुसरा सर्वात मोठा आयातदार बनला आहे. येथे ५६० हजार कोटी रु. सोन्याची दरवर्षी आयात होते. डिसेंबर २०२१ पासून मालमत्तेत अस्थिरता आणि व्याजदरात चार वेळा कपात होऊनही मौल्यवान धातूंची गुंतवणूक ही सर्वात वेगाने वाढणारी ग्राहक बाजारपेठ आहे.
गेल्या डिसेंबरमध्ये सोने, चांदी आणि दागिन्यांची विक्री गेल्या सहा वर्षांतील सर्वाधिक होती. त्यात वार्षिक २९.४% वाढ नोंदवली गेली. आर्थिक अनिश्चिततेच्या काळात तरुणाई आर्थिक सुरक्षेसाठी शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि बिटकॉइनपेक्षा पारंपरिक पर्यायांवर अधिक विश्वास ठेवत आहे.
सोने खरेदीचा हा ट्रेंड सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहे. विबोवर ‘व्हाई आर यंग पीपल गेटिंग इन बाइंग गोल्ड’ या हॅशटॅगला ९ कोटींहून अधिक हिट्स मिळाले आहेत. अनेक Influencer लोक सोन्याच्या दागिन्यांबाबत लाइव्ह कार्यक्रम घेत आहेत. अनेक कंपन्या खरेदीदारांच्या मदतीसाठी पॉडकास्टदेखील चालवत आहेत.
SL/ML/SL
18 March 2024