अर्थसंकल्पीय आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीत प्रत्येकी 2 टक्क्यांची वाढ

मुंबई, दि. ३ ( जितेश सावंत) : अस्थिर अर्थसंकल्पीय आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीत प्रत्येकी 2 टक्क्यांची वाढ होताना दिसली. बाजाराने गेल्या दोन महिन्यांतील सर्वात मोठी साप्ताहिक वाढ नोंदवली. अंतरिम बजेट , FOMC बैठक परिणाम (keeps interest rates unchanged), सकारात्मक जागतिक संकेत आणि भारताचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल या पार्श्वभूमीवर निफ्टीने नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला.
अंतरिम अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी बाजारात मोठी वाढ होताना दिसली सरकार वित्तीय तूट कशी कमी करता येईल,पायाभूत सुविधांचा विकास आणि परवडणारी घरे यावर लक्ष केंद्रित करणार असल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळेल या आशेने तसेच सरकारने सार्वत्रिक निवडणुकांच्या अगोदर मोठ्या घोषणांचा पाऊस न पाडल्याने बाजाराने या बजेटचे स्वागत केले. मात्र काही विदेशी गुंतवणूकदारानी आयएमएफच्या देशावर सातत्याने वाढत असलेल्या कर्जाबाबत चिंता व्यक्त केली आहे.आयएमएफने असे म्हटले आहे की, कर्ज याच गतीने वाढत राहिले तर लवकरच ते सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) १००% हून जास्त होईल.IMF Warns India on Debt Concerns, Says It May Exceed 100% of GDP. अमेरिकन शेअर बाजार नवीन विक्रमी उच्चांकावर व्यवहार करत आहे. शुक्रवारी Dow Jones 134.58 अंकांची बढत घेऊन बंद झाला.
Technical view on nifty-.
शुक्रवारी निफ्टीने 22,126.80 चा ऐतिहासिक उच्चांक गाठला आणि 21853.8 चा बंद भाव दिला. निफ्टी साठी 21812-21797.
30-21740.80-21697-21640-21598-21576.05 हे महत्वाचे सपोर्ट स्तर आहेत हे तोडल्यास निफ्टी21547-
21517- 21500 21477-21448-21434-21365-21329-21285 हे स्तर गाठेल. तर वरच्या स्तरावर निफ्टी साठी
21962.05-22018.
55-22126-22183.30-22239.80 हे रेसिस्टन्स ठरतील.
सेन्सेक्सची 1241 अंकांची उसळी
आशियाई बाजारांच्या सकारात्मक कामगिरीमुळे भारतीय बाजाराची,
अर्थसंकल्पीय आठ्वड्याची सुरुवात अत्यंत नेत्रदीपक झाली.बाजाराने मागील सत्रातील नुकसान भरून काढले.निफ्टी आणि सेन्सेक्स यामध्ये प्रत्येकी 2 टक्क्यांची वाढ झाली.सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे 72,000 आणि 21,750 च्या पातळ्यांना स्पर्श केला. HDFC BANK,RIL IND तसेच बँकिंग शेअर्सच्या वाढीमुळे बाजार जोरदार वाढला, त्यातच चांगल्या यूएस डेटाने फेडरल रिझर्व्हकडून लवकर व्याजदर कपातीची आशा पल्लवित झाली त्याचाही फायदा बाजाराला होताना दिसला.
दिवसभराच्या अखेरीस
सेन्सेक्स 1,240.90 अंकांनी वधारून 71,941.57 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 385 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 21,737.60 चा बंद दिला. Sensex up 1,241 pts
सेन्सेक्स 802 अंकांनी घसरला
मंगळवारी सकारात्मक सुरुवातीनंतर, बाजाराने सुरुवातीच्या तासातच सगळा नफा पुसून टाकला.दिवस पुढे सरकताना तोटा वाढत गेला आणि शेवटच्या तासात विक्रीचा दबाव वाढला.आगामी FOMC बैठक, अंतरिम बजेट आणि मध्य पूर्वेतील वाढत्या तणावापूर्वी गुंतवणूकदारानी सावध पवित्रा स्वीकारला.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 801.67 अंकांनी घसरून 71,139.90 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 215.50 अंकांची घट होऊन निफ्टीने 21,522.10 चा बंद दिला. Sensex plunges 802 points बजेट, फेड निकालापूर्वी सेन्सेक्स 612 अंकांनी तर, निफ्टी 21,700 च्या वर अधिकतम आशियाई बाजरातील कमकुवतपणा, संमिश्र जागतिक संकेत असून सुद्धा बजेट पूर्व सत्रात बाजाराने चांगलीच बढत घेतली. बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली परंतु निफ्टीने दिवसभरात 21,700 चा टप्पा ओलांडून सुरुवातीचा तोटा पुसून टाकला.
अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला आणि यूएस फेडरल रिझव्र्हच्या बैठकीच्या निकालापूर्वी झालेल्या खरेदीमुळे बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने प्रत्येकी एक टक्का वाढ केली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 612.21 अंकांनी वधारून 71,752.11 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 203.60 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 21,725.70 चा बंद दिला.
अंतरिम अर्थसंकल्पीय सत्रात सेन्सेक्स 107 अंकांनी घसरला
गुरुवारी बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये चांगली वाढ दिसून आली.परंतु नंतर अस्थिरतेमुळे चढउतार दिसून आले. निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प संसदेत अर्थमंत्री सीतारामन यांनी सादर केला.बजेट सादर करण्यापूर्वी बाजार दिवसाच्या उच्च पातळीवर पोहोचला,परंतु अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर बाजाराला कोणताही आधार मिळाला नाही आणि तो घसरून बंद झाला.कोणत्याही मोठ्या घोषणांशिवाय अर्थसंकल्प सादर केल्यामुळे बाजारातील घसरण वाढली परंतु बाजार बंद होताना सपाट बंद झाला. Sensex ends Interim Budget session 107 points lower.
निफ्टीने गाठला नवीन उच्चांक
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी,अंतरिम अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी जागतिक बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेतांच्या पार्श्वभूमीवर बाजाराने दमदार सुरुवात केली आणि मोठी झेप घेतली. दुपारच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 1445 अंकांची तर निफ्टीत 430 अंकांची वाढ झाली.निफ्टीने 22,126.80 चा ऐतिहासिक उच्चांक गाठला.मागील सत्रातील अंतरिम अर्थसंकल्पावरील शांत प्रतिक्रियेनंतर मात्र शेवटच्या दिवशी बाजाराने जोरदार प्रतिक्रिया नोंदवली. परंतु वरच्या स्तरावरून प्रॉफिट बुकींगमुळे मोठी घसरण झाली. Nifty hits new high.
(लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत)
jiteshsawant33@gmail.com
ML/KA/SL
3 Feb. 2024