विवेक अग्निहोत्रींच्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : द कश्मिर फाईल फेम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता एका अजून एका वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयावरील चित्रपटासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या ‘द वॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. देशातील कोविड-19 च्या काळातील भारतीय शास्त्रज्ञांचा संघर्ष या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर द वॅक्सिन वॉर या चित्रपटाची चर्चा होत आहे. हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार असून विशेष बाब म्हणजे हा भारतातील पहिला बायो-सायन्स चित्रपट आहे
.
नाना पाटेकर, गिरिजा ओक सप्तमी गौडा आणि पल्लवी जोशी हे कलाकार वॅक्सिन वॉर या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. नाना पाटेकर शास्त्रज्ञांचे प्रमुख आहेत,असं ट्रेलरमध्ये दिसत आहे. शास्त्रज्ञांचे इमोशन्स द वॅक्सिन वॉर या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहेत. ट्रेलरमध्ये लसीवर काम करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांबात देखील दाखवण्यात आलं आहे. ट्रेलरमध्ये अभिनेत्री रायमा सेन ही एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच अभिनेते अनुपम खेर यांनी देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे.
‘सुना मैंने, आपके साइंटिस्ट के पास एक लाख रुपये भी नहीं थे।’ हा नाना पाटेकर यांचा डायलॉग ट्रेलरच्या सुरुवातीला ऐकू येतो. त्यानंतर पल्लवी जोशी म्हणतात, ‘मेरे नहीं सर, भारत के साइंटिस्ट।’ विवेक अग्निहोत्री यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर करुन द वॅक्सिन वॉर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्याची माहिती दिली. ‘द वॅक्सिन वॉर’ हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली अशा 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
SL/KA/SL
12 Sept. 2023