परळी वैजनाथ मंदिर इथे भक्तांची मांदियाळी…

बीड, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील परळी येथील प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाविकांची मांदियाळी लोटली आहे. शंकराचार्य यांच्या श्लोकाप्रमाणे बारा जोतिर्लिंगांपैकी असलेलं बीड जिल्ह्यातील परळी येथील प्रभू वैजनाथ मंदिर पाचव्या क्रमांकावर येतं. वैजनाथाच्या दर्शनासाठी आज पहिल्या श्रावणी सोमवारी भाविकांनी मोठी गर्दी केलीय.सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्यामुळे प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी रात्री १२:०० वाजल्यापासून मंदिरात भाविकांनी गर्दी केली. मंदिर परिसरात १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत तर गर्दी नियमन करण्यासाठी बरीकेटिनगची व्यवस्था देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. प्रभू वैजनाथाचे दर्शन घेण्यासाठी राज्यासह परराज्यातून भाविक येतात. आज पहिल्या श्रावणी सोमवारी एक लाखा पेक्षा अधिक भाविक दर्शन घेणार असल्याची माहिती वैद्यनाथ ट्रस्टचे माजी सचिव राजेश देशमुख यांनी दिलीय.
ML/KA/SL
21 Aug 2023