उपग्रहाप्रमाणे काम करणारा सौर इलेक्ट्रीक ड्रोन

 उपग्रहाप्रमाणे काम करणारा सौर इलेक्ट्रीक ड्रोन

लंडन, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : PHASA-35 या नावाचा केवळ 150 किलोचा सौर इलेक्ट्रीक ड्रोन तयार करून ब्रिटनमधील एका कंपनीने उपग्रह निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आव्हान दिले आहे.लवकरच या ड्रोनचे प्रक्षेपण करण्यात येणार असून तो १ वर्षांपर्यंत कार्यरत आहेत. हजारों किलोंचे उपग्रह बनवण्यासाठी प्रचंड खर्च येतो. त्यामुळे हे ड्रोनचे हे तंत्रज्ञान खूपच किफायतशीर ठरणार आहे.

या ड्रोनचे पंख 115 फूट लांब आहेत. यामध्ये सोलर पॅनल बसवले आहेत. ड्रोनमध्ये कॅमेरा, सेन्सर्स, दळणवळणाची साधने यांसारखे 15 किलोपर्यंतचे सामान ठेवता येते. हे दुर्गम भागात (ज्या भागात इंटरनेट सुविधा पोहोचत नाही) 4G आणि 5G संपर्क सेवा प्रदान करण्यास सक्षम आहे. ड्रोनचे वजन खूपच कमी असल्याने सॅटेलाइट तंत्रज्ञानाला पर्याय म्हणून या ड्रोनकडे पाहिले जात आहे.

PHASA-35 हा ड्रोन स्ट्रॅटोस्फियर या वातावरणाच्या दुसऱ्या थरात राहील. येथे गुरुत्वाकर्षण शक्ती असते. अशा परिस्थितीत ते उडण्यासाठी पंखे सतत फिरत राहणे आवश्यक असते. हे पंखे सौर पॅनेलवर चालणारे आहेत. दिवसा, ते सूर्याच्या उर्जेवर फिरतील आणि बॅटरी देखील चार्ज करतील. रात्री बॅटरीच्या उर्जेवर काम करेल. एका वर्षात बॅटरीचे आयुष्य संपण्यापूर्वी ते जमिनीवर उतरवले जाईल.

स्ट्रॅटोस्फियरमध्ये असल्याने, हा सौर ड्रोन पर्यावरण निरीक्षण, आपत्ती निवारण, सीमा सुरक्षा, सागरी आणि लष्करी पाळत ठेवण्यास मदत करू शकते. दीर्घकाळ गुप्त माहिती देण्यासाठी, लष्करी निरीक्षणासाठी देखील हे उपयुक्त ठरेल. यामध्ये विशेष प्रकारचे सेन्सर बसवले जाऊ शकतात. हे सेन्सर जंगलांचे निरीक्षण करणारे सेन्सर, तसेच झाडांच्या आर्द्रतेच्या पातळीचे निरीक्षण करून जंगलातील आगीचा इशारा देऊ शकतात.

SL/KA/SL

18 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *