आरोग्य विभाग आता स्वतःच करणार बांधकामे आणि दुरुस्तीही
मुंबई दि १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व रुग्णालये , प्राथमिक आरोग्य केंद्रे यांची देखभाल ,दुरुस्ती तसेच नवीन होणारी बांधकामे आता स्वतःच करणार असल्याची माहिती या खात्याचे मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.ते मंत्रालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.
आरोग्य केंद्रे, कर्मचारी निवासस्थाने आणि रुग्णालये यांची देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी आजवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत आहे, त्यांच्याकडे त्यासाठी निधी देखील दिला जातो. मात्र तक्रार दिल्यानंतर तब्बल तीन ते सहा महिने इतका कालावधी जातो , त्यामुळे त्यांची बकाल अवस्था कायम राहते असे मंत्री म्हणाले.
नवीन रुग्णालये बांधकाम करताना ही ती बांधल्यानंतर आमच्या गरजेप्रमाणे त्यात तोडफोड करण्यात येते , त्यामुळे वेळ आणि पैसा वाया जातो , यासाठी हे सर्व खात्यांतर्गत करावे असा प्रस्ताव आपल्या खात्याने दिला असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्याला तत्वतः मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर येईल आणि त्याला मान्यता मिळेल असे सावंत म्हणाले.
सुमारे सहाशे कोटी रुपयांचा निधी आमच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला जातो आहे मात्र आमच्या आस्थापनेतून ते केले तर त्यावरचा आस्थापना खर्च चाळीस कोटीच्या घरात आहे , तेही बाहेरून काम करून घेतात तसे आम्ही देखील करून घेऊ , मात्र यामुळे आमच्या इमारतींचे बांधकाम लवकर , हवे तसे आणि दुरुस्ती अभावी होणारी अवस्था चांगली ठेवण्यास वेळ लागणार नाही असेही तानाजी सावंत म्हणाले.
ML/KA/SL
14 June 2023