चोराचे ह्रदय परिवर्तन, तब्बल १५ तोळे सोने केले परत

 चोराचे ह्रदय परिवर्तन, तब्बल १५ तोळे सोने केले परत

पालघर, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या समाजामध्ये चोरी आणि दरोडेखोरीच्या घटना वाढल्या असताना पालघर जिल्ह्यामध्ये एका चोराने चोरलेले तब्बल १५ तोळे सोने परत करून आश्चर्याचा धक्का दिला आहे आणि पोलिसांचे काम सोपे केले आहे. केळवे पोलीस ठाणे अंतर्गत राहणाऱ्या प्रतीक्षा ठकसेन तांडेल यांच्या घरी 31 मे रोजी चोरी झाली होती. त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले दागिने चोरट्याने लंपास केले होते. या प्रकरणात तांडेल कुटुंबियांनी केळवे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ज्यांनी कोणी चोरी केली असेल त्यांनी ती कबुल करावी, अशा पोलिसांनी केलेल्या भावनिक आव्हानाला साथ देत चोरट्याने तब्बल 15 तोळे सोने मालकाला परत केले आहे.

तांडेल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत स्थानिक नागरिकांना आवाहन केलं. या आव्हानाला साथ ह्रदय परिवर्तन झालेल्या चोरट्याने चोरलेले तब्बल 15 तोळ सोने रात्रीच्या सुमारास प्रतीक्षा यांच्या भावाच्या घरासमोर आणून ठेवलं.”मला माफ करा,अशी चूक मी पुन्हा करणार नाही”,अशी चिठ्ठी देखील चोरट्याने लिहिलं. या घटनेने फिर्यादींना आपलं सोन पुन्हा मिळालं असून त्यांनी पोलिसांचेही आभार मानले आहेत.

दरम्यान ही बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली असून यावर उलट सुलट चर्चा रंगत आहे.काही नेटकऱ्यांनी या प्रामाणिक चोराचे कौतुक केले आहे तर काहींनी हा चोर नेहमीच्या माहितीतील व्यक्ती असावा असा कयास बांधला आहे. हे पोलीस खात्याच्या जनसंवाद अभियानाचं यश असल्याचं पालघर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

SL/KA/SL

10 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *