मान्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल अपेक्षित

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी एक आनंदवार्ता दिली. विभागाच्या अंदाजानुसार, यंदा मान्सून सामान्य राहील. तो येत्या 4 जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. 18-19 मेच्या दरम्यान मान्यून अंदमानमध्ये दाखल झाला. त्यानंतर मान्सून केरळमध्ये उशिरा येईल अशी चर्चा होती. मात्र आता हवामान विभागाने मान्सूनबाबत मोठी माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
डॉक्टर डी एस पै यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, पुढील आठवड्यात अरबी समुद्रात कोणतेही वादळ येण्याची शक्यता नाही. देशभरात सर्वत्र चांगला पाऊस झाला तर चांगले होईल. शेतीवर फारसा परिणाम होणार नाही. सद्यस्थितीवर बोलायचे तर वायव्य भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे.
जून ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या काळात भारतात दीर्घकालीन सरासरीच्या 96 टक्के पर्जन्यमान अपेक्षित आहे. त्यात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत चार टक्के कमी किंवा जास्त होऊ शकतात.
SL/KA/SL
26 May 2023