RBI कडून केंद्र सरकारला 87,416 कोटी रुपयांचा लाभांश
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षासाठी अपेक्षेपेक्षा जास्त लाभांश देण्याची घोषणा केली आहे. RBI ने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला 87,416 कोटी रुपयांचा लाभांश देण्याची घोषणा केली आहे. सरकारला यावर्षी RBI कडून 48 हजार कोटी रुपयांचा लाभांश मिळणे अपेक्षित होते.RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत या वर्षीच्या लाभांशाचे प्रमाण तिप्पट आहे. गेल्या वर्षी आरबीआयने सरकारला लाभांश म्हणून 30,310 कोटी रुपये दिले होते. RBI कडून दरवर्षी सरकारला लाभांश देण्यात येतो.
बोर्डाच्या बैठकीत आरबीआयची आर्थिक स्थिती, जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक आव्हाने यावरही चर्चा झाली. रिझर्व्ह बँकेने संपूर्ण आर्थिक वर्षात कोणती कामे केली आणि मध्यवर्ती बँकेचा वार्षिक खाते अहवालही मंजूर करण्यात आला. आकस्मिकता निधी 5.5 टक्क्यांवरून 6 टक्के करण्यात आला आहे.
SL/KA/SL
20 May 2023