सेप्टिक टॅंक स्वछ करतांना पाच जणांचा गुदमरून मृत्यू
परभणी, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सेप्टिक टॅंक स्वच्छ करण्यासाठी टॅंकमध्ये उतरलेल्या पाच जणांचा गुदमरून मृत्यू झालाय तर एक जण गंभीर झाल्याची घटना परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील भाऊंचा तांडा येथे घडली आहे.Five persons died of suffocation while cleaning septic tank
भाऊचा तांडा येथे विठ्ठल मारोती राठोड यांच्या फार्म हाऊस वर काल दुपार पासून काही जण सेफ्टी टॅंक स्वच्छ करीत होते, सायंकाळी 8 वाजताच्या दरम्यान टॅंक मध्ये जाणारे मध्येच बेशुद्ध पडत असल्याचे एका जणाच्या लक्षात आले, सदर घटना त्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने सेफ्टी टॅंक फोडून 6 जणांना बाहेर काढले ,यात 5 जणांचा गुदमरून मृत्यू झालाय,तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर परळी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत,
मयत पाच जणांचे मृतदेह परभणी शासकीय रुगणालयात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. यात बाप लेक, जावई, आणि एका चुलत भावाचा मृतांमध्ये समावेश आहे.
ही सर्व जण सोनपेठ शहरातील रहिवाशी आहेत, शेख सादेक (वय ४५) त्यांचा मुलगा शेख शाहरुख (वय २०)त्यांचा जावाई शेख जुनेद ( वय २९ ) जावेदचा भाऊ शेख नविद (वय २५) चुलतभाऊ शेख फिरोज वय( १९ )अशी मयताचे नावे असून शेख साबेर ( वय १८) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर परळी येथे उपचार सुरू आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली आहे, सेफ्टी टॅंक मध्ये गॅस तयार होऊन ही मजूर मृत झाल्याचा अंदाज वर्तविला जातोय..
ML/KA/PGB
12 May 2023