#भारताकडे दोन अंकी विकास दर गाठण्याची क्षमता- अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांचा विश्वास
नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत दोन-अंकी विकासदर गाठू शकतो असा विश्वास अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. ठाकूर यांनी सांगितले की, तरुण आणि महत्वाकांक्षी वर्ग तसेच ग्रामीण क्षेत्राकडून निर्माण झालेया मागणीच्या जोरावर उत्पादन कामांचा विस्तार होईल आणि डिजिटल सेवा क्षेत्रात तेजी दिसून येईल. या जोरावर दोन अंकी विकास दर गाठण्याची देशाकडे क्षमता आहे.
कंपनी सचिवांच्या 48 व्या राष्ट्रीय परिषदेला मार्गदर्शन करताना अर्थ राज्यमंत्री म्हणाले की, अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँके्कडून (आरबीआय) अवलंबिण्यात येत असलेल्या 48 मानकांपैकी 30 मानकांची पातळी यावर्षी फेब्रुवारीच्या पातळीपेक्षा जास्त आहे.
ठाकूर यांनी सांगितले की, गेल्या सहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने एकामागून एक सुधारणांसंबंधीचे निर्णय घेतले आणि उपक्रमांना पुढे नेले. यामुळे समाजात महत्त्वपूर्ण बदल दिसून आले आहेत. ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार, आता महागाईपासून ते वित्तीय तूट, परकीय चलन साठ्यापासून ते चालू खात्यातील तूट आणि आणि सकल देशांतर्गत उत्पादनाच्या वाढीपासून ते आर्थिक समावेशनापर्यंत सर्वप्रकारचे निर्देशक आर्थिक स्थिरता आणि सामर्थ्याचे संकेत देत आहेत.
टाळेबंदीनंतर आर्थिक परिस्थितीतील सुधारणेबाबत ठाकूर म्हणाले की त्याचा व्यापक पुरावा आहे आणि हे केवळ कृषी क्षेत्रातून येणार नाही. प्रवासी आणि दुचाकी विक्री, इंधन वापर, पोलाद उत्पादन, सिमेंट उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहू यासह इतर अनेक क्षेत्रात आम्ही लक्षणीय सुधारणा केल्या आहेत.
Tag-India/GDP/Double digit/Anurag Thakur
PL/KA/PL/21 DEC 2020