पुण्यात मिळत आहेत चक्क EMI वर आंबे

पुणे, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंब्याच्या सिझन सुरू झाला असला तरीही अद्याप अवकाळीपावसामुळे बाजारात आंब्यांची आवक मंदावली आहे. त्यामुळे आंब्यांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्या योग्य नाहीत. यावर उपाय म्हणून पुण्यातील एका चतुर आंबा विक्रेत्याने चक्क EMI वर आंबे विकायला सुरुवात केली आहे. या विक्रेत्याकडे अस्सल चवीचे आणि नैसर्गिकपणे पिकवलेले देवगड हापूस आंबे उपलब्ध आहेत.
गौरव सणस या आंबा विक्रेत्याने अनोख्या पद्धतीने त्यांच्या ग्राहकांना ईएमआयवर आंबा खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. निसर्ग वादळानंतर कोकणातील आंब्याची सर्वात स्वादिष्ट जात हापूस आंब्याच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे, ज्यामुळे ग्राहकांना एक खरेदी करण्यापूर्वी दोनदा विचार करावा लागतो.
तथापि, ईएमआय पर्यायासह, सणस आंबा प्रेमींना आंबे खरेदीची एक चांगली संधी देऊ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता आंब्यापासून वंचित रहावे लागणार नाही.
SL/KA/SL
8 April 2023