निरी चे कार्य आता लोकांपर्यंत

 निरी चे कार्य आता लोकांपर्यंत

नागपूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नागपूरच्या वर्धा रोड स्थित विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद सीएसआर च्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात नीरी येथे निरीतर्फे केल्या जाणाऱ्या संशोधन कार्याची माहिती सर्व हितधारकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘वन वीक वन लॅब’ (एक आठवडा एक प्रयोगशाळा) या संपर्क उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

निरी या संस्थेची स्थापना 8 एप्रिल 1958 रोजी झाली होती याचे औचित्य साधून सामान्य जनता, विद्यार्थी, उद्योग त्याचप्रमाणे ग्रामीण तसेच वनाशी संबंधित ग्रामस्थ या सर्व हितधारकांना निरीच्या मार्फत राबवल्या जाणारे उपक्रम, संशोधन यांची माहिती होण्यासाठी तसेच या सर्व हितधारकांना पर्यावरण विषयक भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्याकरिता ‘वन वीक वन लॅब’ या संपर्क तसेच संवादात्मक कार्यक्रमाचे 8 एप्रिल ते 13 एप्रिल या सात दिवसा दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये महिला सक्षमीकरण, ग्रामीण आणि वनाधारित संस्था, इंडस्ट्री आणि एमएसएमई मीट त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासन संस्थांसोबतची बैठक अशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निरी संस्थेचे संचालक डॉ. अतुल वैद्य यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.Niri’s work now to the public

घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन या पर्यावरण तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान संदर्भात असणाऱ्या मुद्द्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांना पर्यावरणीय उपाय शासकीय स्तरावर प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी बैठकीचेही आयोजन 11 एप्रिलला करण्यात येईल असे देखील अतुल वैद्य यांनी यावेळी सांगितले.

देशाच्या हरित विकास योजनेचा एक भाग म्हणून एमएसएमई क्षेत्र, उद्योग आणि सरकार यांच्याशी सहकार्य, आणि विविध पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून होणार आहे. सामान्य नागरिक, ग्रामीण जनता,विद्यार्थी, सूक्ष्म आणि लघु उद्योग, महिला सक्षमीकरण,,या क्षेत्रातील भागधारकांना विविध चर्चासत्र, प्रदर्शनी, परिसंवाद या माध्यमांतून आपली भूमिका मांडता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पथनाट्य आणि नाटक प्रस्तुती द्वारे नीरीची पर्यावरणाबद्दल भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचा शुभारंभ आजपासून झालेला आहे.

ML/KA/PGB
8 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *