पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व जन्मशताब्दी वर्षाचे मुबंईत आयोजन
मुंबई, दि.4( एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक आणि संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘कालजयी’ सादर करताना कुमार गंधर्व प्रतिष्ठानाला आनंद होत आहे. जन्मशताब्दीच्या निमित्ताने उदघाटनपर सोहळ्याचे आयोजन 8 ते 9 एप्रिल रोजी टाटा थिएटर, एनसीपीए येथे होणार असून भारतातील विविध शहरामध्ये वर्षभर सुरु राहील. यामध्ये संगीत, नृत्य, नाटक आणि साहित्य अशा विविध कला क्षेत्रांतील नामवंत कलाकारांचे कला आविष्कार आणि सादरीकरणांचा समावेश असेल.”दोन दिवस चालणाच्या या संगीतोत्सवात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील काही अत्यंत प्रतिभावान कलाकारांचा कला आविष्कार सादर होणार आहे. टाटा थिएटर येथे 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:30 वाजता भुवनेश कोमकली यांच्या गायनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर विश्वविख्यात निलादी कुमार सतारवादन करतील. पहिल्या दिवसाच्या सोहळ्याची सांगता पंडित उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल.”दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:30 वाजता याच ठिकाणी सोहळा पुन्हा सुरू होईल. यावेळी कलापिनी कोमकली त्यांचे स्वरमयी गायन, प्रख्यात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन आणि त्यानंतर पंडित वेंकटेश कुमार यांच्या सशक्त गायकीने कार्यक्रमाची सांगता होईल. सुप्रसिद्ध अभिनेता आणि नाट्य-लेखक अनुल तिवारी हे दोन्ही मंत्रांचे सूत्रसंचालक असतील. या दोन दिवस चालणाऱ्या रंगतदार कार्यक्रमात सुरेश तळवलकर, मंदार पुराणिक, सत्यजीत तळवलकर, ओजसअडिया, प्रशांत पांडव तबल्यावर तर सुयोग कुंडलकर आणि निरंजन लेले हार्मोनियमवर साथ-सांगत करणार आहेत.या सादरीकरणाशिवाय, या संगीतोत्सवात 9 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता एक्सपिरीमेंटल थिएटर येथे एक विशेष संवादात्मक सत्र असेल. ज्याचे संचालन पंचम निषादचे शशी व्यास करणार आहेत. या सवात प्रसिद्ध नृत्यांगना शमा भाटे, ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर आणि कुमारजीचे ज्येष्ठ शिष्य सत्यशील देशपांडे ही कलाकार मंडळी भारतीय शास्त्रीय संगीतातील अजरामर दिग्गज (पंडित कुमार गंधर्व जी) यांचा वारसा आणि त्यांनी दिलेल्या योगदानाविषयी चर्चा करतील,असे शशी व्यास यांनी प्रेस क्लब मध्ये बोलताना सांगितले.
ML/KA/PGB 4 APR 2023