देशाचा GDP दर घटणार, जागतिक बँकेचा अंदाज

 देशाचा GDP दर घटणार, जागतिक बँकेचा अंदाज

नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गत आर्थिक वर्षात देशातील प्रत्यक्ष कर संकलनात लक्षणिय वाढ झाल्याची दिलासादायक माहिती नुकतीच समोर असताना जागतिक बँकेकडून भारताला काहीसा सावधगिरीचा देण्यात आला आहे. जागतिक बँकेने भारताच्या वाढीचा अंदाज पुन्हा एकदा कमी केला आहे. आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालात बँकेने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारताचा जीडीपी ६.३ टक्क्यांवर खाली येण्याचा अंदाज आहे,

भारताचा GDP दर सध्या ६.६ टक्क्यांपर्यंत आहे. जागतिक बँकेने आपल्या इंडिया डेव्हलपमेंट अपडेटमध्ये सांगितले की, आर्थिक स्थितीची मंद वाढ आणि आव्हानात्मक बाहेरील परिस्थितीमुळे भारतातील विकासाला बाधा येण्याची शक्यता आहे.

कर्ज घेण्याच्या वाढत्या खर्चामुळे आणि संथ उत्पन्न वाढीमुळे लोकांच्या खासगी आयुष्यावर दबाव वाढेल. कोरोना महामारीशी लढताना संबंधित सरकारची वित्तीय स्थिती डळमळीत झाली असल्यानं आर्थिक परिस्थिती फारशी उत्साहवर्धक नाही, असा सावध इशारा जागतिक बँकेने भारताला या अहवालाद्वारे दिला आहे.

SL/KA/SL

4 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *