राहुल गांधी लोकसभा सदस्य म्हणून अपात्र

नवी दिल्ली, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॉंग्रेस पक्षाला हादरा देणारी आणि देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण करणारी एक घडामोड आज घडली आहे. काल सुरत उच्च न्यायालयाने कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टिका केल्या प्रकरणी मानहानीच्या गुन्हा अंतर्गत दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी आता राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्त्व रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
राहुल गांधी यांना शिक्षा होण्याचे कारण
गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाने सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. गेल्या आठवड्यात याप्रकरणी सुनावणी पार पडली होती. काल याप्रकरणी न्यायालयाने राहुल यांना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर लगेचच त्यांना जामीनही मंजुर करण्यात आला.
या खटल्याच्या निकाला दरम्यान न्यायालयात उपस्थित असलेले राहुल गांधी म्हणाले, ”मी नेहमी भ्रष्टाचाराविरोधात बोलतो. मी कोणाच्या विरोधात मुद्दामहून बोललो नाही. यामुळे कोणाला नुकसान झालेले नाही”, असे न्यायालयाला सांगितलं. मात्र, न्यायालयाने त्यांना भादंविच्या कलम ५०४ अन्वये दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावणी तसेच त्यांना जामीनही मंजूर केला.
SL/KA/SL
24 March 2023