राहुल गांधी यांना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा
सुरत, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टिका करणे चांगलेच महागात पडले आहे. सुरत न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, मात्र जामीन मंजूर झाल्याने त्यांना या शिक्षेतून सुटका मिळाली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाने सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. २०१९ मध्ये कर्नाटच्या कोलार येथे आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आडनावावरून टीका केली होती. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. याविरोधात गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार तथा माजी मंत्री पुरनेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. गेल्या आठवड्यात याप्रकरणी सुनावणी पार पडली होती. आज याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
या खटल्याच्या निकाला दरम्यान न्यायालयात उपस्थित असलेले राहुल गांधी म्हणाले, ”मी नेहमी भ्रष्टाचाराविरोधात बोलतो. मी कोणाच्या विरोधात मुद्दामहून बोललो नाही. यामुळे कोणाला नुकसान झालेले नाही”, असे न्यायालयाला सांगितलं. मात्र, न्यायालयाने त्यांना भादंविच्या कलम ५०४ अन्वये दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावणी तसेच त्यांना जामीनही मंजूर केला.
SL/KA/SL
23 March 2023