सुभाष देसाई यांच्या सुपुत्राचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश

मुंबई , दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून उद्धव ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करणाऱ्या शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या सुपुत्राने शिंदे यांचे नेतृत्व आज स्वीकारले . ठाकरेंच्या अनेक निष्ठावंतांनी यापूर्वी शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला होता , अनेक मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व अमान्य असल्याचं सांगत शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला. मात्र या सगळ्यात उद्धव ठाकरेंबरोबर काही जुनी खोडं राहिली होती. त्यात लिलाधर डाके, मनोहर जोशी, सुभाष देसाई, गजानन किर्तीकर अशी मंडळी होती. यातल्या खासदार गजानन किर्तीकर यांनीही शिंदे गटाची कास धरली मात्र त्यांच्या मुलाने ठाकरेंची साथ सोडली नाही, मात्र सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
ML/KA/PGB