अकोला-पूर्णा रेल्वे विद्युतीकरणाचे काम पूर्ण

वाशिम, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अकोला-पूर्णा रेल्वे विद्युतीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आतापर्यंत या मार्गावरून तीन टप्प्यात विद्युत चाचणी पूर्ण झाली आहे.

हिंगोली ते मरसूळपर्यंत विद्युत चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी झाल्याची माहिती वाशीम वाणिज्य विभागाकडून देण्यात आली.

अकोला-पूर्णा या २०९ किमी लांबी असलेल्या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून केवळ अनुषंगिक कामे शिल्लक आहेत. ही कामे पुढील काही दिवसांत पूर्ण होणार आहेत. पूर्णा रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या मरसुळ रेल्वेस्थानकापर्यंत विद्युत चाचणी पूर्ण झाली आहे. Akola-Poorna railway electrification work completed

त्यामुळे उर्वरित कामे आटोपल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा झाल्यानंतर लवकरच या रेल्वे मार्गावरुन विद्युत इंजिन असलेल्या रेल्वे गाड्या धावणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून प्राप्त झाली आहे. यामुळे प्रवासात वेळेची बचत होणार आहे.

ML/KA/PGB
4 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *